चुंचाळे- सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान येथे हजरत चाँदशाहवली बाबाच्या यात्रोत्सव मंगळवारी होणार आहे. सकाळी ढोल-ताश्याच्या गजरात चादर चढवण्यात येईल व दुपारी शावका बाबा यांच्या घरापासून संदल काढण्यात येईल. गावातील सर्वच दर्ग्यावर पवित्र चादर व शेरणी हिंदू मुस्लिम तडवी बांधवाच्या उपस्थितीत चढवली जाईल. संदल ही मुख्य चौकात आल्यावर येथील गैबनशाह बाबाच्या दरगाहपासून वाजत गाजत गायराण येथील चाँदशाहवली बाबांच्या दरगहा जवळ संदल ची समाप्त होईल. यात्रोत्सवानिमीत्त विविध खेळण्याची दुकाणे लहान मुलासाठी पाळणे दाखल झाले आहेत.
यात्रोत्सवाच्या दिवशी कव्वाली
यात्रोत्सवाच्या रात्री कव्वाल असलम आतीष (कोल्हापूर) तर कव्वालन फरीना सुलतांना (कोल्हापूर) यांच्यात कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे. यावल पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तायडे, विकास सोनवणे यांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.