यावल । तालुक्यातील चुंचाळे येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जिर्ण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडुन व माजी शिक्षण सभापती यांच्या पाठपुराव्याने शाळेला तीन खोल्यांचे काम मंजुर झाले आहे. सदरील मंजुर काम हे सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजुर झाले आहे. या कामाचे भूमीपूजन साकळी दहीगाव गटाचे व शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तीन खोल्यांचे काम मंजुर झाले असुन उर्वरीत दोन खोल्या लवकरच मंजुर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
वर्ग खोल्यांचे बांधकाम उत्कृष्ठ दर्जाचे करण्याची हर्षल पाटील यांची सुचना
तसेच यावल पंचायत समिती उपसभापती उमाकांत पाटील यांनी सांगितले की, शिक्षणाचा धंदा बंद करायचा असेल तर सर्वानी आपल्या मुलाचे प्रवेश हे जिल्हा परिषद शाळेतच करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील यांनी मुख्यध्यापकांना शाळेचे काम हे चांगल्या प्रतीचे करावे असे सांगितले. यावेळी सभापती संध्या महाजन, उपसभापती उमाकांत पाटील, सदस्य दिपक पाटील, माजी शिक्षण समिती सभापती हर्षल पाटील, चुंचाळे सरपंच ज्योती नेवे, उपसरपंच सिराज तडवी, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राजपुत, बोराळे सरपंच मायाबाई राजपुत, उपसरपंच उज्जैनसिंग राजपुत व सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान कोळी, उपाध्यक्ष नजिमा तडवी, व सदस्य प्रमोद चौधरी, अरमान तडवी सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते संदिप सोनवणे, वढोदा केंद्र प्रमुख पी.एम. सोनार, साकळी ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, चुंचाळे विकासो माजी चेअरमन सुनिल नेवे, व्हा.चेआरमन दगडु तडवी, किशोर महाजन, दहीगाव जुम्मा तडवी, रामकृष्ण सोनवणे, ईस्माईल तडवी, देवचद कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालान शाळेचे मुख्यध्यापक गिरीष सपकाळे तर आभार भरत चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल वाणी, राजु सोनवणे, मजित तडवी, सुरेखा त्रिपाठी यानी परीश्रम घेतले.