चुंचाळे येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी

0

यावल। तालुक्यातील चुंचाळे येथील समर्थ सुकनाथ बाबा याची तपोभुमी समर्थ रघुनाथ बाबा याची जन्मभुमी व समर्थ वासुदेव बाबा याची कर्मभुमी असलेल्या चुंचाळे येथे त्याच्या शिष्यगण परीवाराकडून शनिवार 8 रोजीपासून गुरुपोर्णीमेनिमीत्त कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त तयारी पुर्णत्वास आली आहे. हजारो भाविक येथे सुकनाथ बाबा रघुनाथ बाबा व समर्थ वासुदेव बाबा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात चुंचाळेसह परिसरातील वासुदेव बाबा यांचे शिष्यगण गुरु शिष्यामधील नाते अंखडीत राहावे या हेतुने हा गुरुपोर्णीमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

गावात पालखीची मिरवणूक
दरवर्षाप्रमाणे शिरपुर येथील 400 ते 500 भक्तगण पायी चालत चुंचाळे येथे येतात. त्यांच्या प्रवासात पहीला मुक्काम बाभळुज दुसरा मुक्काम चोपडा व तीसर्‍या दिवशी धानोरा येथे जेवण करुन संध्याकाळी 7 वाजता चुंचाळे असा पायी प्रवास करतात. तसेच शनिवारी संध्याकाळी संपुर्ण गावात पालखीची मिरवणूक काढली जाते

अभिषेक, आरतीसह महाप्रसादाचा कार्यक्रम
यावेळी गावातील सर्व समाजातील शिष्यगण मोठ्या आनदाने पालखीत सामील होतात व रात्री 8 वाजता ही हंडी फोडण्यात येते. पहाटे 5 वाजता मुर्तीस्नान 6 वाजता मारोती अभिषेक दुपारी 12 वाजता महाआरती संध्याकाळी 7 वाजता आरती, आरतीची वेळ सोडुन दिवसभर भजने व भारुडे सुरु राहतील. दुपारी 1 वाजेपासुन ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल असे वासुदेव बाबा भक्त गण व वासुदेव बाबा भजनी मंडळामार्फत करण्यात आले आहे.