चुंचाळे येथे पावसाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

0

यावल। तालुक्यातील चुंचाळे येथील विद्युत रोहित्र जळाल्यामुळे याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊन ग्रामपंचायतीचा गावठाण पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासुन ठप्प झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या दोन दिवसापासुन पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असल्याने मनसेतर्फे मोफत टँकर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यांनी केले सहकार्य
युवासेनेतर्फे ग्रामस्थांची होत असलेली दमछाक पाहुन मदतीचा हात पुढे केला असून सर्व सदस्यांनी स्वखर्चाने प्रत्येक प्रभागात टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. शाखा प्रमुख लिलाधर धनगर, उपप्रमुख मनोज अहीरे, योगेश पाटील, दिपक कोळी, सुधाकर कोळी, बंडु कुभार, सोपान पाटील, किरण पाटील, विशाल राजपुत, सागर राजपुत, उमेश राजपुत, अण्णा टेलर, भरत कोळी, मुस्तुफा तडवी, गणेश राजपुत, गोकुळ कोळी यांनी सहकार्य केले.

विहीरींचा सहारा
पाण्यासाठी ग्रामस्थ शेतातुन तर कुणी बैलगाडीवरुन व वासुदेव बाबा मंदिरावरील असलेल्या टाकीतुन पाणी भरताना दिसत होते. पाण्यासाठी एकमेव सहारा असलेली गाव विहीर गावातील वायरमनच्या मदतीने पाणी पुरवठा विहीरीजवळच सुरु करण्यात आल्यावर काही महीला तेथेही पाणी भरताना दिसत आहे.