चुंचाळे येथे बारागाड्या उत्साहात

0

गावाले आले यात्रेचे स्वरुप

चुंचाळे, ता.यावल:- गुढीपाडव्यानिमित्त रविवारी चुंचाळे गावातील ग्रामदैवत मरीमातेच्या बारागाड्या मरीमातेच्या जयघोषात ओढण्यात आल्या. 18 रोजी सकाळपासूनच गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. प्रथम श्री समर्थ वासुदेव बाबा दरबार, हनुमान मंदिर, मरीमाता मंदिर, महादेव मंदिर, खंडेराव मंदीर या मंदिरात सायंकाळी सहा वाजेला विधीवत पुजा करण्यात आली व भगत व बगले यांनी दर्शन घेवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. भगत गोकुळ कोळी यांनी बारागाड्या ओढल्या तर त्यांना बगले युवराज धनगर व गोकुळ राजपूत (आबा) यांनी सहकार्य केले. वहर म्हणून सतीश राजपूत व कविता सतीश राजपुत होत्या. यावेळी बारागाड्या पूजनाचा मान प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांनी मिळाला. बारागाड्यांची विधीवत पूजा नायगाव येथील नागमंत्री अमृत पाटील, जगन्नाथ पाटील, भावराव पाटील, सुकदेव धनगर, मंगल पाटील, आनंदा कोळी, अरुण मराठे, एकनाथ महाराज, धनराज पाटील, नारायण महाराज यांनी केली. बारागाड्या पाहण्यासाठी महिलांसह सर्व गावातील समाजबांधवाची मोठी गर्दी होती.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी देवचंद कोळी, वि.का.सो.सचालक ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, ग्रा.पं.सदस्य सुकलाल राजपूत, ग्रा.पं.माजी सदस्य रवींद्र सोनवणे, युवा सेना अध्यक्ष लिलाधर धनगर, वाय.वाय.पाटील, राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काशिनाथ पाटील, धनसिंग राजपूत, रहेमान तडवी, सलीम तडवी, मुबारक तडवी, शरद पाटील, पुंडलीक पाटील, मानसिंग राजपूत, ज्ञानेश्वर गारखेडे, युवराज दादा, दिवाकर पाटील, संजय पाटील, दिलीप राजपूत, नितीन पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी परीश्रम घेतले. पोलीस पाटील गणेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.