यावल। तालुक्यातील चुंचाळे येथे समर्थ रघुनाथ बाबा व समर्थ वासुदेव बाबा या गुरु-शिष्यांचा पुण्यतिथी सोहळा रविवार 7 रोजी पासून सुरुवात होत आहे. या सोहळ्यामध्ये पहाटे 5 वाजता समाधी स्नान, 6 वाजता मारुती अभिषक, 7 वाजता आरती, 11 वाजता होमहवन, दुपारी 12 वाजता महाआरती, सायंकाळी 7 वाजता आरती, रात्री 8 वाजता भजन व भारुड अशा कार्यक्रमांसह दुपारी 1 ते 3 पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
समर्थ रघुनाथ बाबा व त्यांचे शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुध्द बारसला समाधिस्त झाले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त चुंचाळे येथील वासुदेव बाबा दरबारात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येेतात. सुकनाथ बाबा हे काशी येथून चुंचाळे येथे आले होते. त्यांनी अखंड 12 वर्षे मौन व्रत ठेवून तप केले. म्हणून ही भूमी त्यांची तपोभूमी म्हणून ओेळखली जाते. त्यांचे शिष्य व चिरंजिव रघुनाथ बाबा यांचा जन्म चुंचाळे येथेच झाला. म्हणून त्यांची जन्मभूमी ओळखली जाते. दोघेही गुरु-शिष्य समाधिस्त झाल्यानंतर ग्रामस्थ व शिष्य परिवाराच्या सहकार्याने गावात मंदिर उभारण्यात आले. मंदिरातर्फे पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात येत असतो.