चुंचाळे विद्यालयाचा 12 वी परिक्षेत 96.20 टक्के निकाल

0

यावल । फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून तालुक्यातील चुंचाळे येथील श्री सर्मथ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचा निकाल 96.20 टक्के लागला. यात एकुण 79 विद्यार्थापैंकी 76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात पुजा किशोर देशमुख 466 गुणांसह प्रथम, आरती किशोर देशमुख 465 गुणांसह द्वितीय तर निशा दिलीप आहिरे 461 गुण मिळवून तृतीय आली आहे. त्यांना प्रा. शारदा चौधरी, प्रा. जमिला तडवी, प्रा. आर.जे. अडकमोल यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे श्री सर्मथ वासुदेवबाबा अध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चौधरी, उपाध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव जगन्नाथ कोळी, सर्व संचालक, प्राचार्य व्ही.जी. तेली, वनवासी वस्तीगृहाचे अधीक्षक चंद्रकांत चौधरी, योगेश कोळी, वासुदेवबाबा दरबार, भजनी मंडळ, पालक ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.