यावल- तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने तंबाखूमुक्तीचा 20 मिनिटांचा व्हिडीओ दाखवण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ विद्यालयाचे उपशिक्षक एस.एस.पाटील यांनी दिली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य व्हि.जी.तेली, उपशिक्षक डी.बी.मोरे, वाय.वाय.पाटील, एम.पी.पाटील, एम.आर.चौधरी, एस.एन.चौधरी, एस.बी.गोसावी, एन.जे.पाटील, पी.एस.सोनवणे, प्रा.शारदा चौधरी, प्रा.राकेश अडकमोल, प्रा.जमिला तडवी तसेच कर्मचारी आदी उपस्थित होते.