साकळी– हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या चुंचाळे येथील हजरत गैबनशाह बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त आज, शुक्रवारी सायंकाळी दर्ग्यापासून सवाद्य संदल मिरवणूक निघणार आहे तर शनिवार, 2 रोजी यात्रोत्सव साजरा होत असल्याने व्यावसायीकांनी दुकाने थाटली आहेत. आज सायंकाळी गैबनशाह बाबा यांच्या पवित्र दर्ग्यापासून ढोल-ताशांच्या गजरात संदल मिरवणूक निघणार आहे. हनुमान चौक, चव्हाण वाडा, धनगर वाडा, तडवी वाडामार्गे मिरवणूक मुख्य चौकात येईल. दर्ग्यावर हिंदू-मुस्लीम-तडवी बांधवाच्या उपस्थितीत चादर चढवली जाणार आहे. दोन दिवसीय यात्रोउत्सवात तडवी समाजातील उपवर मुला-मुलींचे विवाह जुळणार असल्याने ग्रामस्थांकडे नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहेत. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत गैबनशाहवली बाबांच्या दर्ग्यावर नवस मानल्यानंतर ते पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.