चुंबन देता-घेताना अँगल लागतोच

0

चुंबन घेणे म्हणजे एकमेकांचे चेहेरे आणि ओठ सरळ रेषेत समोरासमोर आणून केली जाणारी क्रिया नाही. चुंबन घेणारा उजवीकडे डोके वाकवतो आणि चुंबन देणारा स्वतःला त्या कोनांमध्ये स्थिर करतो असा संशोधन अहवाल बांगलादेशातील मेंदुच्या अभ्यासकांनी आणि मनोवैज्ञानिकांनी समोर आणला आहे. ढाका विद्यापीठ, बाथ, आणि बाथ स्पा यांनी चुंबनावरील हे चेतामानसशास्त्रीय संशोधन केले. त्यात जोडीदाराचे डोके ज्या दिशेला वळते तिकडे चुंबन घेणारा वळतो, असे मांडण्यात आले आहे.

पाश्चिमात्य देशातील चुंबन क्रीयेवर आतापर्यंत अभ्यास झालेला आहे. पौर्वात्य देशांमध्ये चुंबन सार्वजनिक नसून ती अत्यंत खाजगी बाब मानली जाते. सायंटिफिक रिपोर्ट या जर्नलमध्ये चुंबन अभ्यास प्रसिद्ध करण्यापूर्वी बांगलादेशातील ४८ जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला. जोडप्यांना चुंबन घेण्यासाठी त्यांच्या घरातच परवानगी दिली होती. त्यांचा अनुभव नोंदवताना पुरूष आणि स्त्री ला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेण्यात आले.

स्त्रियांपेक्षा १५ पट पुरूषांनी चुंबन घेण्यात पुढाकार घेतला. ते घेताना दोघांनीही उजव्याबाजूला झुकण्याचा प्रयत्न केला. डॉ. रिझाउल करीम ढाका विद्यापीठाच्या मानशास्त्र विभागात आहेत. ते म्हणतात, हा अभ्यास करण्याचे प्रयोजन म्हणजे आधी चुंबन घेण्यावर व्यक्ती स्त्री की पुरूष याचा परीणाम होतो का हे पाहणे. आम्हाला आढळले की पुरूषच पुढाकार घेण्याची शक्यता जास्त असते. ७९ टक्के पुरूष असा पुढाकार घेतात. चुंबन घेणाऱ्याच्या डोक्याची दिशा चुंबन देतो त्याच्या हालचाली नियंत्रित करतो. कोणत्याही परीस्थितीत समोरासमोर सरळरेषेत चुंबन क्रीया होता नाही. उजवीकडे वळणे क्रमप्राप्तच असते. चेतासंस्थांशी संबंधित हा अभ्यास आहे.

संशोधकांनी काही जोडप्यांना आरशातील प्रतिमेशी जणु चुंबन घेतोय असा प्रकार करायला सांगितला. सरळ चुंबन घेण्यास सांगितले. पण त्या जोडप्यांनी रसभंग झाल्याचा अभिप्राय दिला.