चुकार कंपन्यांची बँक खाती गोठवा

0

नवी दिल्ली : आर्थिक विवरण पत्रे आणि रिटर्न सादर न करणाऱ्या कंपन्यांची बँक खाती गोठवा अशी सूचना केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला केली आहे. अर्थराज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनीही लोकसभेत रिझर्व्ह बँकेने चुकार कंपन्यांचा तपशील रिझर्व्ह बँकेने सर्व बँकाना पाठवावा. योग्य ती काळजी घेण्यासाठी ही सूचना गंगवार यांनी मध्यवर्ती बँकेला केली आहे. १२ जुलै रोजी उद्योग व्यवहार मंत्रालयाने एक लाख ६२ हजार ६१८ कंपन्यांची नावे कंपनी रजिस्टरमधू काढून टाकली. त्यांची खाती गोठवावी असा प्रयत्न सरकार करीत आहे.

कंपनी कायद्यानुसार आवश्यक असलेली आर्थिक विवरणपत्रे आणि रिटर्न अनेक कंपन्या मुदत संपून खूप कालावधी लोटला तरी भरीत नाहीत. रिझर्व्ह बँकेने मात्र आपल्याला तसे अधिकार नसल्याचे सांगितले आहे. अनलॉफूल एक्टीव्हीटीज प्रिव्हेन्शन एक्ट आणि फॉरिन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन एक्ट नुसार सरकारने खाती गोठविण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले होते ते बँकांकडे पाठविले आहेत, असे गंगवार यांनी लोकसभेतील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कंपनी कायदा २०१३ काय सांगतो…
कंपनीने विहित मुदतीच्या तीस दिवसांच्या आत आर्थिक विवरणपत्रे सादर करावीत. त्यापेक्षा उशीर झाल्यास २७० दिवसाच्या आत जरूर तो दंड भरून विवरणपत्रे सादर करता येतील.