मुंबई: केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही? त्याची तुलना का करत नाही? असा प्रश्न उपस्थित करत लोकांना नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेच्या मूडबद्दल मोठ विधान केलं आहे. राज्यात महाविकास आघाडीच गणित जुळवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा राजकीय प्रयोग केला. मोदींनी आपल्या ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही शरद पवार यांनी सत्तास्थापनेनंतर केला होता. एका इंग्रजी वृत्त्प्तर्ला दिलेल्या मुलाखतीत या मुद्यावर बोलताना पवार यांनी केंद्रातील सत्ताबदलाविषयी भाष्य केलं.
पवार म्हणाले, नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का?, असं पवार म्हणाले.
पर्याय उपलब्ध करून न देण्याचा दोष कुणाचा? याप्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की अ (मोदी) हा चुकीचा आहे आणि अ (मोदी) ला ब उत्तर देऊ शकतो. मी असं केलं आहे आणि त्यानंतर मिळणारा लोकांचा पाठिंबा मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात, असंही पवार यावेळी म्हणाले.