चुकीच्या नंबरची विचारणा करताच महिलेला शिविगाळ

Abusing a woman in a chain on a mobile phone: a crime against one यावल : तालुक्यातील साकळी येथील 28 वर्षीय महिलेला एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर कॉल करून शिविगाळ केली. आपण कोण बोलत आहात ? असे केवळ विचारल्यानंतर कोणतेही कारण नसताना अज्ञाताने महिलेस शिविगाळ केली. यावल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा
साकळी गावातील जयश्री गोकुळ अडकमोल (28) या महिलेला मोबाईल क्रमांक 7887585868 या मोबाईल क्रमांकावरून एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला. अडकमोल यांनी आपण कोण बोलत आहात या संदर्भात विचारणा केल्याने संबंधित व्यक्तीने नाव न सांगितल्याने महिलेने पुन्हा विचारणा केल्यानंतर संबंधिताने महिलेला कारण नसतांना शिवीगाळ केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.