चुणेकर बिनविरोध

0

मुरुड : मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापचे महेश रामचंद्र चुणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारती बंदरी ह्या होत्या तर निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामविकास अधिकारी अविनाश पिंपळकर ह्यांनी कामकाज पाहिले.