‘चुनाव का महिना राफेल करे शोर’; जितेंद्र आव्हाडांची मोदींवर फिल्मी स्टाइल टीका

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला सातत्याने लक्ष करत असतात. दरम्यान त्यांनी आता राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्यावर टीका केली आहे. आव्हाड यांनी एका गाण्याच्या माध्यमातून पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. आव्हाड यांनी एकदम फिल्मी स्टाइलमध्ये टीका केली आहे. या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवरुन शेअर केला आहे. ‘सावन का महिना पवन करे शोर’ या मिलन सिनेमातील गाण्याच्या चालीवर आव्हाडांनी ‘चुनाव का महिना राफेल करे शोर’ हे गाणे गायले आहे.


मूळ गाण्यातील शब्दांमध्ये बदल करत त्यांनी हे गाणे रचल्याचे आव्हाड हातात गिटार घेऊन या व्हिडिओत सांगताना दिसतात. गाण्याच्या पहिल्या कडव्यामध्ये मोदी सरकारवर राफेल मुद्द्यावरुन टीका केली आहे.

‘चुनाव का महिना राफेल करे शोर.. पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…
अनिल को तुमने देखो काँन्ट्रॅक्ट दिलाया.. भारत की जनता को मूर्ख बनाया…
अब चाहे जीतने मारो तुम सिक्स और फोर… पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…’

तर दुसऱ्या कडव्यामध्ये आव्हाडांनी मोदी यांनी नवाज शरीफ यांना पाकिस्तानमध्ये जाऊ दिलेल्या भेटीवरुन टोला लगावला आहे. या कडव्यात ते म्हणातात

‘नवाज के घर मे तुमने बिर्याणी खाई… हमने हमेशा उनसे दुश्मनी निभाई…
अब चाहे जितना मचाओ तू जोर से शोर… पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…’

शेवटच्या कडव्यामध्ये आव्हाडांनी नोटबंदीवरुन मोदींना लक्ष्य केले आहे. शेवटच्या कडव्यात ते म्हणतात..

चौदा को तुमने बोहोत भाषण दिलवाये… पाच साल मे लेकिन तुमने किसे कटवाऐ…
वी डोन्ट हॅव मनी, मिस्टर मोदी एनी मोर… डोन्ट चीट अस मोदी वीआर नोट फूल्स एनीमोर…’

या व्हिडीओखालील कमेंटमध्ये अनेकांनी आव्हाड यांच्यावर टिका केली असून काहीजणांनी त्यांचीच मस्करीही केल्याचे पहायला मिळत आहे.