चुरशीच्या सामन्यात एस.एम.स्टयकर संघाचा एच.के.बाऊंस संघावर 10 धावांनी विजय

0

समद फल्ला क्रिकेट अकॅडमीच्यावतीने आयोजित एफ.सी.प्रो.लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा

हॅरी सावंतच्या भेदक गोलंदाजी समोर एच.के.बाऊंस निष्प्रभ

खडकी : समद फल्ला क्रिकेट अकॅडमीच्यावतीने आयोजित एफ.सी.प्रो.लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत एस.एम.स्ट्रायकर संघाने एच.के.बाऊंस संघाचा 10 धावांनी पराभव करीत स्पर्धेत बाजी मारली. 4 षटकात 6 धावा देत 2 गडी बाद करणारा एस.एम.स्ट्रायकरचा भेदक गोलंदाज हॅरी सावंत याने सामन्याचा मानकरी किताब पटकविला. येथिल क्रीसॅलीस मैदानावर सुरु असलेल्या या पिंक बाँल टी-20चे सामने सुरू आहेत.

हॅरी सावंत हा सामन्याचा मानकरी

सातव्या सामन्यात एस.एम.स्ट्रायकरने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एच.के.बाऊंस संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करीत एस.एम.स्ट्रायकरला धक्का दिला. 15 षटकात 7 गडी बाद 91 धावांवर त्यांचा खेळ संपुष्टात आणत कडवी लढत दिली. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना एच.के.बाऊंसची ही दमछाक झाली. हॅरी सावंतच्या भेदक गोलंदाजी समोर एच.के.चा डाव 9 गडी बाद 81 धावांवर संपुष्टात आला. एस.एम.ने एच.केचा 10 धावांनी पराभव करीत पुढील फेरी गाठली. 4 षटकात 6 धावा देत 2 गडी बाद करणारा हॅरी सावंत हा सामन्याचा मानकरी ठरला.

रोहन रुद्राकेमुळे मोठा विजय

प्रसिध्द क्रिकेटपटु रोहीत काकडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेतील 8 व्या सामन्यात एस.एम.स्ट्रायकर विरूद्ध यश गंगा ग्रुपमध्ये लढत झाली. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा एस.एम.च्या बाजुने जात या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत षटकात एस.एम.ने 8 गडी बाद 102 धावा फडकविल्या. रोहन रुद्राके याच्या 55 धावांच्या बळावर एस.एम.संघाने यश गंगा समोर 102 धावांचे कडवे आवाहन उभे केले. मोठ्या धावसंख्येचे आवाहन पेलताना यश गंगाचा खेळ सर्वगडी बाद 76 धावांवर आटोपला. एस.एम.संघाने यश गंगा ग्रुप वर एकतर्फी लढतीत 26 धावांनी दणदणीत विजय मिळवीत आपली विजयी घोडदौड चालु ठेवली. 55 धावांची खेळी करीत संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला शैलीदार फलंदाज रोहन रुद्राके यांस प्रसिद्ध क्रिकेटपट्टु रोहन काकडे यांच्या हस्ते सामन्याचा मानकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सईदा फल्ला संघाचे कर्णधार समीर मोमीन व खेळाडु आदी उपस्थित होते.