शस्त्राने केली तिघांची हत्या
नाशिक । घोटीजवळील खेडभैरव वाडीमध्ये तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. येथे चुलत पुतण्याने धारदार शस्त्राने आपली चुलती, चुलत भावजयीची हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान घडली. सूत्रांनुसार, या घटनेत एका लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे. आरोपी 12 वी उत्तिर्ण असून पदवीचे शिक्षण घेत आहे. गावात एकटाच एवढा शिकलेला असूनही नोकरी लागत नसल्याने चुलती त्याला टोमणे मारायची. या रागातून त्याने धारदार शस्त्राने वार करून हे हत्याकांड केल्याची कबुली दिली आहे.
याप्रकरणी आरोपी सचिन चिमटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत महिलांची नावे मंगला चिमटे आणि हिराबाई चिमटे अशी आहेत. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झालेले असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना सकाळी 9 वाजेची असल्याचे सूत्रांकडून कळते. जास्त शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसल्याने चुलती टोमणे मारत होती. या रागातून आरोपी सचिन चिमटे याने चुलतीवर वार केला. चुलत भावजयी वाचवण्यासाठीमध्ये आल्यावर त्यानेही तिच्यावर वार केले. दरम्यान, झटापटीत लहान मुलाच्या डोक्यात मार लागल्याने तोही ठार झाला.