काही तासातच आरोपीला स्वारगेट येथून अटक
पिंपरी-चिंचवड : घरासमोर सांडपाणी साचत असल्याच्या कारणावरुन ताथवडे येथे कोयत्याने तोंडावर वार करून 40 वर्षीय इसमाचा खून करण्यात आला. ही घटना सोनवणे वस्ती येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. यातील आरोपी हा मयताचाच चुलत भाऊ असून पळन जाणा-या आरोपीला स्वारगेट पोलीसांनी खबर मिळताच काही तासात अटक केले. सतिश गुलाब सोनवणे (वय 40, रा. सोनवणेवस्ती, ताथवडे), असे मयताचे नाव आहे. तर आरोपीचे नाव दीपक श्रीरंग सोनवणे (वय 30 रा. सोनवणेवस्तीन, ताथवडे) असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सांडपाणी साचल्याचे कारण
आरोपी व मयत यांच्यात बुधवारी सांडपाण्यावरुन भांडणे झाली होती. त्याचाच राग म्हणून आज सकाळी पुन्हा भांडणे करत आरोपीने स्वतःच्याच भावार कोयत्याने वार केले. यामध्ये सतिश जागीच मरण पावला. या घटनेनंतर आरोपी तेथून पळून जाऊन थेट स्वारगेट येथील एस टी बसस्थानकात पोहचला. दरम्यान स्वारगेट पोलिसांना खबर्याद्वारे काळा शर्ट व पांढरी ट्रॅक पॅन्ट घातलेला इसम खून करुन पळून जात असल्याची खबर मिळाली. एस.टी स्टॅन्ड परीसरात पेट्रोलींग करणारर्या पोलिसांनी सापळा रजून आरोपीला तातडीने अटक केले व वाकड पोलीसांच्या हवाली केले.