धुळे । आई एकवीरा व्हीजन चॅनेलचे मालक ओमप्रकाश शर्मा यांनी पत्रकार पदाचा गैरवापर करुन तक्रार अर्जदाराच्या कुटुंबाची मानहानी, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने आई एकवीरा व्हीजन चॅनेल व प्रसारण एक दिवसासाठी 16 ऑगस्ट 2017 रोजी बंद करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिले आहेत.
याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. मिसाळ यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे, चंद्रकांत मोहन येशीराव, रा. धुळे यांनी आई एकवीरा व्हीजन चॅनेल या दूरचित्रवाहिनीच्या विरुध्द भारत सरकारच्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडी आदेशातील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांचेकडेस तक्रारी अर्ज दिला होता.