चॅम्पियन ट्रॉफी ठरविणार विश्‍वकप खेळणार की नाही!

0

कोलकाता । क्रिकेट मधील तीनही फॉरमेंन्टमध्ये ज्याने आपला दबदबा उमटविला.ज्याने आपल्या आगळ्या वेगळ्या निर्णयानी सर्वांना आश्‍चार्यांचा धक्के दिले. एक उत्तम कर्णधार त्याचबरोबर एक ग्रेट फिनिशर होता.त्याच्या हेलीकॉप्टर शॉटमुळे तो अनेकांना धडकी भरायची.तो चांगल्या चांगल्या गोलंदाजाचा चेंडू सिमारेषेपार पाठवण्याची ताकद ठेवत असे.असा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी उर्फ माहि हा 2019 चा विश्‍वकप खेळणार की नाही हे चॅम्पियन टॉफी ठरविणार असल्याचे मत धोनी लहानपणीचे प्रशिक्षक केशव बनर्जी याचे म्हणणे आहे.

जगातील सर्वश्रेष्ठ फिनिशर
तीन महिन्यानंतर होणार्‍या चॅम्पियन ट्रॉफी महेद्रसिंह धोनीचे भविष्य ठरविणार आहे.अंडर 14 टूर्नामेंटच्या उद्घाटन वेळी केशव बनर्जी म्हणाले की, माहीचे लक्ष सध्या चॅम्पियन ट्रॉफिवर आहे. या ट्रॉफीत तो यशस्वी झाला तर मला वाटते की, तो 2019चा विश्‍वकप खेळेल.यशस्वीता व परायज यानंतर धोनी हा जगातील सर्वश्रेष्ठ फिनिशर हा महेद्रसिंग धोनी आहे असे म्हणणे बनर्जी याचे आहे.प्रशिक्षक म्हणाले की, निसर्गाचा नियम आहे की वय वाढल्यानंतर आपले स्ट्राइक रेट बरोबर आपण धावा बनवू शकत नाही. मात्र माही मध्ये इच्छा शक्ती व खेळाचे आकलन करण्याची क्षमता या दोन गोष्टीमुळे त्याला विशेष व वेगळा बनविते. चॅम्पियन ट्रॉफी पहिले स्वत:ला खेळाच्या लय आणण्यासाठी एकदिवसीय ठेवण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे. आयपीएल 10 मध्ये राइजिंग पुणे सुपर जाइंट्स ने माहीला कर्णधार पदावर हटविल्याने बनर्जी आनंदी नाही.ते म्हणाले की, मला वाटत के हा निर्णय संघाच्या मालकांचा आहे. कारण धोनी जवळ हे सत्र खेळण्याशिवाय कोणताच पर्याय नाही आहे. कारण चेन्नई सुपरकिंग्सला निलंबित केले आहे.