चेंबरमधील खारदेवनगर येथे संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरी!

0

मुंबई । भारतीय बौद्ध महासभा खारदेवनगर चेंबूर (शाखा महिला) व भारतीय बौद्ध विकास मंचच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले अण्णाभाऊ साठे माता अहिल्याबाई होळकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षा कल्पना पवार होत्या. सूत्रसंचालन जगदीप कांबळे सेके्रटरी यांनी केले. या कार्यक्रमात सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. सकाळी 9.30 वा. बुद्धवंदना घेऊन ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात पाहुणे रवींद्र पवार, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश राजेंद्र नगराळे, कार्याध्यक्ष वाहतूक संघटना मुंबई काँग्रेस अभिषेक मेस्त्री अध्यक्ष दा. म. मुंबई युवक काँग्रेस गणेश गांगुर्डे, भारिप बहुजन महासंघ दीपक सावंत, मुमताज शेख इत्यादी उपस्थित होते.

मान्यवरांनी लावली हजेरी
गोवंडी पो. ठाण्याचे वरीष्ठ पो. निरीक्षक शशीकांत माने हे उपस्थित राहून भारतीय बौद्ध महासभा महीला शाखेच्या पदाधिकारी कल्पना पवार कविता कांबळे संगीता पंडीत, रोहिणी कांढाळे, मनीषा गंगावणे, मनीषा खंडागळे, शशिकला जाधव, एकबोटे मावशी, अंजली केंजळे, नंदा साळवी यांनी माने साहेबांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हे आलेल्या पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केलेल्या घटनेची माहिती दिली. 12 तास ड्युटीचे 8 तास ड्युटी केली, गरोदर महिलांना प्रसूती काळात सहा महिन्यांची भर पगारी रजा मंजूर केली, शिक्षणासाठी स्कॉलरशिप व भारतीय रिझर्व बँकेची स्थापना अशी अनेक कामे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली, अशी माहिती दिली. हे आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री सिध्दार्थ कांबळे रवींद्र पंडित जगदीप कांबळे, बालचंद्र खंडागळे, महेश साळवे, संतोष सोनावणे, संजय लोखंडे यांनी मेहनत घेतली. शेवटी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रम संपवण्यात आला.