चेंबूर मध्ये खड्यात फसला कचर्‍याचा डंपर

0

घाटकोपर : चेंबूर टिळक नगर येथे आज सकाळी एक कचार्‍याचा डम्पर पालिकेने केलेल्या अर्धवट कामामुळे खड्ड्यात फसला.सकाळपासून फसलेला ट्रक 4 वाजेच्या दरम्यान क्रेन लावून काढावा लागला.टिळकनगर येथील इमारत क्रमांक 30 आणि 34 च्या मधे पालिकेने पावसाळ्यात पाणी भरते म्हणून गेले दीड महिना 15 ते 20 फूट खोल खड्डा खोदून काम केले.या आठवड्यात काम पूर्ण झाले.म्हणून हा खड्डा त्यातील काढलेल्या मातीने बुजवला.त्यानंतर मात्र त्यावर काहीही न करता गेल्या पाच सहा दिवसापासून हे काम तसेच अर्धवट आहे.ना डांबरीकरण करण्यात आले ना,काँक्रीटिकरण करण्याचे आले.

आज सकाळीपासून मुंबईत पाऊस जोरदार पडत आहे. पालिकेचा कचरा वाहून नेणारा डंपर आज सकाळी आला.चालकाला वाटले हा रस्ता पालिकेने चांगला केला आहे म्हणून डंपर इमारत क्रमांक 30 आणि 34 च्या समोर कचरा भरण्यासाठी उभा केला डंपर हळुहळू जमिनीत जाऊ लागला.चालकाने डंपर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण मागच्या बाजूचे चाक पूर्णतः फसले.सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही .तब्बल सहा तास हा ट्रक असाच फसून होता.यात कचरा असल्याने दुर्गंधी सुद्धा येऊ लागली.चार वाजेच्या दरम्यान क्रेन आणून हा कचर्‍याचा डंपर बाजूला काढण्यात आला.काम अर्धवट करणाऱयांवर कारवाही होणार की नेहमीसारख दुर्लक्ष केलं जाईल आणि झालेली घटना विसरून पुन्हा जैसे थे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.