चेंबूर येथे गावठी कट्ट्यासह 31 वर्षांच्या तरुणाला अटक

0

मुंबई- चेंबूर येथे गावठी कट्ट्यासह एका 31 वर्षांच्या तरुणाला काल चेंबूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा जप्त केला असून त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रेमसिंग नंदसिंग छेडिया असे या आरोपीचे नाव असून तो चेंबूर परिसरात राहतो. आचारी म्हणून काम करताना त्याने ते गावठी कट्टा मुंबई शहरात विक्रीसाठी आणले होते. मात्र त्यापूर्वीच तो पकडला गेला.

चेंबूर येथील चेंबूर गावठाण, सांडू गार्डजवळ काही तरुण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती चेंबूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी काल तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. काल रात्री साडेतीन वाजता एक तरुण सांडू गार्डनहून अक्षय इमारतीच्या दिशेने जात होता. यावेळी त्याला चेंबूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा सापडला. चौकशीत त्याने तो कट्टा विकण्यासाठी मुंबईत आणला होता.