‘चेअरमनपदासाठी पहिले तीन वर्ष भारतीय जनता पार्टी’

खडसेंकडून उल्लेख अन् महाविकास आघाडीत हास्याचे फवारे

जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमनपदासाठी उद्या दि. ३ रोजी निवडणूक होत आहे. संचालक मंडळाच्या निवडीनंतर आज चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात पार पडली. बैठकीनंतर माध्यमांना माहिती देतांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी चेअरमनपदाविषयीची माहिती दिली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणुक लढविली. त्यात २१ पैकी २० जागा आमच्या निवडुन आल्या. त्यामुळे ‘चेअरमनपदासाठी पहिले तीन वर्ष भारतीय जनता पार्टी’ असा उल्लेख होताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी चिमटा घेत अजुनही मनातून गेलेले नाही असे सांगताच हास्याचे फवारे उडाले. त्यावर माजी मंत्री खडसे यांनी कडी करीत सांगितले की, ४० वर्ष दिले असे म्हणताच पुन्हा हास्यकल्लोळ झाला.