रावेर। रावेर तालुका पीक व इलेक्ट्रीक मोटर संरक्षण सहकारी सोसायट्यांची युनियन संस्थेच्या चेअरमनपदी माजी आमदार अरुण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे चेअरमनपदासाठी संचालक मंडळाची विशेष सभा जे.पी. नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात चेअरमनपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी नवनिर्वाचित संचालक विजय चौधरी, कल्पेश नेमाडे, रमेश परतणे, मधुकर पाटील, प्रकाश महाजन, देविदास महाजन, रविंद्र पाटील, विनोद चौधरी, मिना चौधरी उपस्थित होते. निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी डी.डी. पाटील, श्रीराम चौधरी, कडू महाजन यांनी सहाय्य केले. संचालक विजय चौधरी यांनी नवनिर्वाचित चेअरमन अरुण पाटील यांचा सत्कार केला.