चेअरमनपदी पदमाकर देशमुख व व्हा. चेअरमनपदी प्रकाश पाटील

0

शिरपूर । शिरपूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या चेअरमनपदी पद्माकर यशवंतराव देशमुख व व्हाईस चेअरमनपदी प्रकाश भोमा पाटील यांची आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक मनोज चौधरी होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मनोहर पाटील, सुनिल पाटील, संतोष परदेशी, रमेश पाटील, शांताराम महाजन, नंदलाल पाटील, रविंद्र पाटील, रामराव पाटील, सुधाकर पाटील, सुरेश पाटील, जयंत देशमुख, विनोद भिल, सविता देशमुख, श्रीमती निलाबाईपाटील, राजेंद्र मोरे उपस्थित होते. आ. काशिराम पावरा, नगराध्यक्षा जयश्री पटेल, उपनगराध्यक्ष भुपेश पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपन पटेल, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी नगरसवेक व स्वीय सहाय्यक अशोक कलाल, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, बाजार समिती माजी सभापती लक्ष्मण पाटील, मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, पं.स. उपसभापती संजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल माळी, उत्तमरा वमाळी, दिपक गुजर, रविंद्र गुजर, माजी नगरसेवक सोनू सोनार, राजेंद्र सोनार, अशोक श्रीराम, विविध संस्थांचे पदाधिकारी, मित्र परीवार यांनी कौतुक केले आहे.