चेअरमनपदी युवराज पाटील

0

मुक्ताईनगर । तालुक्यातील पूर्णाड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून 13 जागांसाठी ही निवडणूक घेण्या आली होती. युवराज पाटील यांची चेअरमन तर कमलाबाई बेलदार यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाचे तालुका सरचिटणीस संदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित पॅनलचे हे नवनिर्वाचित सदस्य असून विरोधकांना उमेदवारच न मिळाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती.