भातखंडे । तालुक्यातील भडगाव तालुक्यातील नावारुपाला आलेली शिक्षण संस्था कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव मार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ह्या साठी नवनविन उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेने सुरु केलेल्या एका नविन उपक्रमाची सध्या परिसरात व जिल्ह्याभरात जोरात चर्चा सुरु आहे. कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था अंतर्गत चेअरमन स्वत: उपस्थित राहून वार्षिक तपासणी करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात स्वत: चेअरमन लक्ष घालून शाळेची दोन दोन दिवस तपासणी करणारी ही एकमेव संस्था आहे. चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील व त्यांच्या समवेत तपासणी अधिकारी म्हणून कमलेश शिंदे सर्व बाबींची पडताळणी करतात. भडगाव तालुक्यात सर्वात मोठी संस्था असून संस्थेच्या तालुक्यात 11 माध्यमिक शाळा, 4कनिष्ठ महाविद्यालये, 2 खाजगी प्राथमिक शाळा, 6 इंग्रजी माध्यमाच्या उच्च प्राथमिक शाळा, 1 अध्यापक व 1 वरिष्ठ महाविद्यालय, 1 बालकामगार शाळा आहे.
अध्यापन ते व्यवस्थापन तपासणी
संस्थेने स्वत:चा वार्षिक तपासणीचा एक अर्ज तयार केला आहे. यात शाळा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करणार्या सर्व बाबींचा समावेश आहे…शिक्षकांचे अध्यापनबाबत कामकाज ,शिक्षक टाचण, वार्षिक व मासिक नियोजन, शिक्षक रजा अर्ज, शिक्षकांचे पाठाचे निरिक्षण, शाळेमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम त्यासाठी स्थापन केलेल्या समित्यांचे प्रत्यक्ष कामकाज, शाळेने राबविलेल्या विविध स्पर्धा परिक्षा, शाळेत शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्त्या आदींची संस्था चालक तपासणी करत आहे.
शाळा सिध्दीसाठी बक्षीस
जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यावर शालेय शिक्षण विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शाळा सिध्दी या उपक्रम सुरु केले असून किसान शिक्षण संस्थेने विशेष दखल घेतली आहे. डिसेंबर 2017 अखेर पर्यंत संस्थेच्या सर्व शाळांना ’अ’ श्रेणी मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित करून दिलेले आहे. त्यासाठी चेअरमन प्रतापराव पाटील यांनी विशेष बक्षीस ठेवले आहे. संस्था अंतर्गत जी शाळा सर्वात प्रथम ’अ’ श्रेणीत येईल त्या शाळेचा विशेष गौरव संस्थेमार्फत केला जाणार आहे. संस्थेत शाळा सिध्दीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
यावर आहे भर
सन 2017-2018 सर्व शाळा डिजीटल करण, सर्व शाळांनी कोणत्याही परिस्थित शाळा सिध्दी मध्ये डिसेंबर 2017 अखेर पर्यंत अ प्रमाणपत्र मिळवणे, सर्व शाळांमध्ये थम्स मशीन व्दारे शिक्षक हजेरी नोंदवणे बंधनकारक, विद्यार्थी सुरक्षेतेसाठी सर्व शाळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, शाळा शालेय परिसरात शिक्षक संख्येच्या प्रमाणात वृक्षलागवड करणे व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येक शिक्षकांकडे निश्चित करणे आदी विषयांवर भर देण्यात आला आहे. संस्थाचालक प्रयत्न करत असल्याने शाळेचा विकास अधिक शक्य झाले आहे.
संस्था अंतर्गत शिक्षण घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. संस्थेच्या बहुतांश शाळा ह्या ग्रामीण भागात आहेत व त्यात शिक्षण घेणारी कष्टकरी शेतकरी बांधवाची मुले आहेत. आज शेतकर्याची अवस्था खूप वाईट होत चालली आहे. त्याला ह्या अवस्थेतून जर बाहेर काढायचे असेल तर त्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण जर मिळायला हवे.
– प्रतापराव हरी पाटील- चेअरमन
तपासणीमुळे सर्व शाळांना खूप फायदा होत आहे. तपासणी मुख्याध्यापकांसाठी एक कवचकुंडलासारखी काम करत आहे. संस्था अंतर्गत आदर्श आचारसंहिता लागू केल्यामुळे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्यास मदत होते. वार्षिक तपासणीत काढण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण घेण्यावर देखील भर असल्यामुळे शाळेला भविष्यात शासनाकडून कोणताही त्रास होऊच शकत नाही.
– गोविंदसिंग पाटील -मुख्याध्यापक भातखंडे