चेकलेस किंग्ज संघाने विजेतेपद राखले

0

मुंबई । डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठान आयोजित सातव्या रुचा खुल्या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत चेकलेस किंग्ज संघाने 21 गुणांची कमाई करत विजेतेपद कायम राखले आहे. चेकलेस किंग्जचा ज्युनिअर संघ स्पर्धेत तिसर्‍या स्थानावर राहिला. ज्युनिअर संघाने स्पर्धेत 19 गुण नोंदवले होते. पण, 10 मॅच गुणांवर पराभूत झाल्याने त्यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत 18.5 गुण नोंदवणार्‍या पण 11 मॅच गुण मिळवणारा कनिंग विनर्स संघ दुसर्‍या क्रमाकांचा मानकरी ठरला. विजेत्या संघाला 10 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तिसर्‍या क्रमाकांच्या संघाना अनुक्रमे सात हजार आणि पाच हजार रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील 16 वर्ष गटात स्मार्ट अ‍ॅटकिंग चॅम्पियन्स, 12 वर्षे गटात आय.सी.इ.के बाहुबली संघ, 10 वर्षाखालील गटात स्मार्ट अ‍ॅटकिंग चॅम्पियन्स आणि 8 वर्षांखालील गटात आ.सी.इ.के ड्रॅगन संघ विजयी ठरला.

बोर्ड पारितोषिके विजेते
प्रथम : मिथिल आजगावकर (चेकलेस किंग्ज), द्वितीय : गोपाळ राठोड ( कनिंग विनर्स), तृतीय : महेश मिश्रा (काईट), चतुर्थ : गौरव बागवे ( चेकलेस किंग्ज ज्युनिअर, 16 वर्षाखालील).