नवी दिल्ली । आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग संघावरील बंदीला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. आता संघाचे चाहते, अधिकारी आणि खेळाडू चेन्नई सुपरकिंगला आयपीएलमध्ये पुन्हा एकदा बघण्यास खूप उत्सुक आहेत. शुक्रवारी संघाच्या आयपीएल पुनरागमनच्या घोषणेनंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी टीमचा माजी कर्णधार एम. एस. धोनीचा उत्साही चाहत्यांना दिसला.
धोनीने अपलोड केलेल्या फोटोला नेटिझन्सकडून चांगली पसंती
धोनीने आपल्या खास शैलीत टीमचे स्वागत केले. टीमच्या पुनरागनची माहिती मिळताच धोनीने इंस्टाग्राम वरुन याबाबतची नुसती माहितीच दिली नाही तर, एक पिवळ्या जर्सीमधील फोटोही शेअर केला. धोनीने अपलोड केलेल्या फोटोला नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे. धोनीने घातलेल्या पिवळ्या जर्सीवर सात क्रमांक लिहला आहे आणि थला असे लिहले आहे. थला म्हणजे लिडर किंवा बॉस असा होतो. आपल्या घराच्या बाहेर गार्डनमध्ये उभा राहून धोनीने फोटो क्लिक केला आहे. यावेळी धोनी सोबत त्याचा कुत्रा ही फोटोमध्ये दिसत आहे. यावेळी धोनीबरोबर त्यानेही फोटोसाठी पोझ दिली आहे. आपल्या चेन्नई टीम बाहेर झाल्यानंतर धोनी रायझिंग पुणे सुपरजाइंट्स टीममधून खेळू लागला होता. फायनल मध्ये मुंबई इंडियन्स टीमकडून केवळ एक धावाने पराभव पत्कारावा लागला होता. चेन्नई सोबत राजस्थान रॉयल्सवरही 2013च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग आणि सट्टा प्रकरणी आयपीएलमध्ये बंदी आली होती.