चेन्नई : चेन्नई विमानताळावर सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने मोठी कामगिरी केली असून या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांकडे २४ किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीटे सापडले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत. या तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल ८ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी चेन्नई सीमाशुल्क विभाग पुढील तपास घेत आहे.
Tamil Nadu: Air Intelligence Unit (AIU) of Chennai Customs seized 24 kg gold worth Rs. 8 crore at Chennai Airport, today. Two South Korean nationals detained. Further investigation underway. pic.twitter.com/olpFg7mW5M
— ANI (@ANI) January 12, 2019