चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील हस्तगत माल फिर्यादींना सोपविला

0

नंदुरबार। जिल्ह्यात झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला पाच लाखाचा मुद्देमाल फिर्यादींना समारंभपूर्वक सोपविण्यात आला आहे. गेल्यावर्षी नंदुरबार जिल्ह्यातील विशेषत: शहादा, तळोदा व उपनगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये अचानकपणे वाढ झाली होती.

हे गुन्हे महिलांशी निगडीत असल्यामुळे त्यांच्या तपासावर पोलिस अधिक्षक राजेंद्र डहाके, उपअधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांच्या पथकाने यासारख्या चोर्‍या उघडकीस आणल्या आहेत. 10 गुन्ह्यामधील 22 तोळे वजनाचे 5 लाख 1600 रुपये किमंतींचा मुद्देमाल हस्तगत करुन खटला चालविण्यात आला होता.सर्व दागिने फिर्यादी महिला सन्मानपूर्वक परत करण्यात आले आहे.