भुसावळ । चैतन्य आर्युर्वेद महाविद्यालयाच्या ताब्याच्या जुन्या वादात आमदार एकनाथराव खडसे सुनावणीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुध्द वारंट काढण्यात आले होते. या खटल्यात आमदार खडसे यांनी सोमवारी भुसावळ अतिरीक्त जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. त्यांचा वारंट रद्द होणे आणि जामीन अर्ज मंजूर झाला.
चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या ताब्यावरुन 20 एप्रिल 2008 रोजीे विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व.मधुकरराव चौधरी आणि ज्ञानदेव चौधरी यांच्यात वाद झाल्यावर महाविद्यालयातील इमारतीमध्ये घुसून काही जणांनी कागदपत्रांसह कपाटाची तोडफोड व फिर्यादी नितीन भोळे यांना धमकी दिली होती. आमदार एकनाथराव खडसेंसह 18 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार खडसे यांच्यातर्फे अॅड. अमितकुमार गुप्ता यांनी काम पाहिले. न्यायालयाबाहेर त्याच्या समर्थकांनी गर्दी केली होती.