चैतन्य निर्माण करणारा फेस्टीव्हल

0

चाळीसगाव । समाजाच्या प्रगतीत रोटरीचे कार्य अनोखे असून हे सर्वशृत आहे. मात्र चाळीसगाव पेैस्टीव्हलच्या माध्यमातून समाजात सृजनशिलता निर्माण करण्याचा प्रयत्न खर्‍या अर्थाने रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटीच्या चाळीसगाव फेस्टीव्हलच्या माध्यमातून केला जात असल्याचे प्रतिपादन आमदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव फेस्टीव्हलचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी व्यापपिठावर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रोटरी मिल्क सिटीचे प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संतोष मालपुरे, अध्यक्षा मेघा बक्षी, कार्याध्यक्ष लालचंद बजाज यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

समाजोन्नतीचे कार्य करण्याचा रोटरी मिल्कचा मानस
फेस्टीव्हलच्या माध्यमातून चाळीसगावच्या उद्योग जगतात तरूणांच्या हातांना बळकट करण्याचा आदर्श हेतू आहे. या फेस्टीव्हल सोबतच चाळीसगावातील मुख्य चौकांच्या सुशोभिकरणाची जबाबदारी रोटरीने घेऊन समाजात जागरूक नागरिकांचे कर्तव्यही पार पाडत आहेत हे अभिमानास्पद असून लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव आपल्या सोबत असल्याच्या भावना आमदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मेघा बक्षी यांनी वर्षभरातील कार्यक्रमांचा हेतू विषद केला तर प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संतोष मालपुरे यांनी चाळीसगाव फेस्टीव्हलच्या आयोजना मागील उद्देश स्पष्ट करत लवकरच संपुर्ण चाळीसगाव तालुका ई-लर्निग करून डिजीटल तालुका करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. शिवाय प्रोजेक्ट मधून समाजोन्नतीचे कार्य करण्याचा मानस असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

यांची होती उपस्थिती मिनाक्षीताई निकम, डॉ. सुनिल राजपूत, डॉ. डि.एस.निकुभ, केशव आप्पा कोतकर, चंद्रकांत ठोंबरे, राजेंद्र छाजेड, विजय अग्रवाल, अरूण भावसार, डॉ. हरीष दवे, रविंद्र शिरूडे, प्रकाश कुलकर्णी, आधार महाले, सुभाष करवा, विमलताई चौधरी, निगार चव्हाण, माया सावंत, ओमप्रकाश शर्मा, सुनिता जाधव, बालाप्रसाद राणा, भरत दायमा, देविदास दायमा, समकीत छाजेड, संग्रामसिंग राजपूत, डॉ. भाग्यश्री शिनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय सोनवणे, चंद्रकांत पाटील, रमेश पोतदार, दिनेश ठक्कर, आनन शिंपी, अविनाश सोनवणे, अ‍ॅड. ज्योती धर्मानी, गणेश निकुंभ, किशन चौधरी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. सुत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले तर आभार लालचंद बजाज यांनी मानले.