जळगाव । ऑटोनगरत कमलेश ढाब्यावर रात्री साडेबाराला चॉपरने हल्ला करून तरुणाला जखमी करण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. किरकोळ वादातातून दारूच्या नशेत असलेल्या पाच ते सहा अज्ञात तरुणांच्या टोळक्याने एकाच्या मांडीत चॉपर खुपसल्याची तक्रार जखमी तरुणाने दिली होती. तिन संशयीतांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. शहरातील तांबापुरातील रहिवासी तरुण रिक्षा चालक अफजल खान कालूखान हा शनिवारी रात्री लहान भाऊ, भाचा व इतर नातेवाईक तरुणांना घेऊन जेवणासाठी ढाब्यावर गेले होते. ऑटोनगर भागात कमलेश ढाबा’ येथे जेवणाला बसले असताना पायाचा धक्का लागल्यावरुन वादाला सुरवात झाली. जखमी अफजलखान कालू खान याच्या तक्रारीवुन औद्योगीक वसाहत पोलीसांत गुन्ह्याची नोंद होवुन पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्यावरुन उपनिरीक्षक रोहन खंडागळे, गोविंदा पाटील, शरद भालेराव, सचिन मुंडे यांनी गणेश प्रकाश चौधरी , नाना शंकर मराठे, योगेश पप्पु शर्मा अशा तिघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.