चोटी गँग आता खोपोलीत, 13 वर्षाच्या मुलीची कापली वेणी

0

मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याण येथे महिलांचे झोपेत केस कापणारी चोटी गँग आता रायगडमध्येही दाखल झाली आहे. खोपोली येथील पाचवीत शिकणार्‍या रिया यादव या मुलीचे केस कापण्यात आले आहेत. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने महिला वर्गात दहशत पसरली आहे.रिया राम यादव (13) ही रात्री झोपली असता, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने तिची वेणी कापली.

झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. यानंतर रियाच्या पालकांनी याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास खोपोली पोलीस करत आहेत. वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे महिलावर्गात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. महिलांचे केस कापण्यामागे नक्की काय हेतू आहे ? हे स्पष्ट होत नसून पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.