नाशिक पोलिस अकादमीत नियुक्ती ; राज्यातील 29 सहा.आयुक्तांना तात्पुरता पदोन्नती
भुसावळ- राज्यातील 29 पोलिस उपअधीक्षकांसह सहाय्यक पोलिस आयुक्तांना तात्पुरता स्वरूपात पदोन्नतीसह पदस्थापनेचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी 17 रोजी काढले आहेत. अधिकार्यांनी तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेशात नमूद आहे. पदोन्नतीत जिल्ह्यातून चोपडा उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक विजयकुमार सुरेश चव्हाण यांचा समावेश असून त्यांची नाशिक पोलिस अकादमीत अपर पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहेत.