चोपडा । येथील भारतीय जैन संघटना आणि संचेती हॉस्पिटल पुणे यांचा संयुक्त विद्यमाने आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या सौजन्याने शनिवारी 29 जुलै रोजी भव्य अस्थिरोग निदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित करण्यात आली आहे. शिबिरात हिप व रीप्लेसमेंट चेकअप, लिगामेंट इंजुरी, डायबेटीज न्यूरोपथी, सांधेदुखी, गुडघेदुखी, सांधे प्रत्यारोपण, पाठीखालील भाग बधिरता व मुंग्या जाणवणे , पाठदुखी ,कंबरदुखी, गुडघ्यामध्ये तीव्र वेदना, संधिवात आदींसह सर्व हाडांचे आजाराचे निदान शिबीरात करण्यात येणार आहे. पदमावती कलेक्शन, टाटिया मार्केट, मनाली इंटरप्राइजेस शिवाजी चौक, न्यू अपना स्टोअर्स, मेन रोड, नवकार फूड्स कचेरी जवळ, महावीर सुपर शॉप शिरपूर रोड, नवकार टि व्ही एस पंकज स्टॉप, लूणकरण नेमिचंद जैन कापड दुकान गोल मंदिर, करसनदास नानाजी मिठाईवाले बाजारपेठ, डॉ.आर.टी.जैन, वर्धमान क्लिनिक आंबेडकर चौक या ठिकाणी नावं नोंदणी सुरु आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.