चोपडा ऑनर किलिंग : अखेर वकिलाविरुद्ध गुन्हा

Now the lawyer is also an accused in the Chopda honor killing case
चोपडा :
बहिणीचे अन्य तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंधातून बहिणीचा गळा आवळून तर प्रियकराचा गोळी झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणाता आता अ‍ॅड.नितीन पाटील यांचादेखील संशयीत आरोपी म्हणून समावेश करण्यात आला असून त्यांच्याविरोधात चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण 13 आरोपींविरोधात गुन्हा
प्रेम प्रकरणाच्या संशयातून वर्षा समाधान कोळी (20, रा.सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (22, रा.रामपूरा चोपडा) या दोघांची हत्या करण्यात आली. वराड रस्त्यावर शुक्रवार, 12 ऑगस्टला घटना घडल्यानंतर आरोपी करण उर्फ कुणाल हा गावठी कट्टा घेऊन स्वतः पोलिसात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली होती. पहिल्या दिवशी पाच आरोपी होते. त्यानंतर आज अखेर एकूण 13 जणांना आरोपी केले आहे. यात अ‍ॅड.नितीन पाटील (रा. गरताड, ता. चोपडा) व गावठी कट्टा पुरवणारा मध्य प्रदेशातील शेखर शिकलकर या दोघांचाही समावेश आहे. पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी अमळनेर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

11 संशयीत ताब्यात
ऑनर किलिंग प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेण्यात आले असून अ‍ॅड. पाटील व शिखलकर हे दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अ‍ॅड.पाटील व खुनातील आरोपी यांच्यात एका हॉटेलात बसून पुरावे नष्ट करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली. दरम्यान, आरोपी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना जळगाव बाल सुधारगृहात पाठवले आहे. मुलीच्या आईसह नऊ जणांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सुरुवातील यांच्याविरुद्ध दाखल झाला होता गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांसह भरत संजय रायसिंग (वय 22, रा.सुंदरगढी, चोपडा, ता.चोपडा), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (19, रा.पंकज स्टाफ, चोपडा, ता.चोपडा), रत्नाबाई समाधान कोळी (37, रा. सुंदरगढी, चोपडा, ता. चोपडा), मयुर काशीनाथ वाकडे (23, गणपती मंदिराजवळ अरुण नगर चोपडा ता. चोपडा), शांताराम अभिमन कोळी (56, शिंदेवाडा, चोपडा), आनंदा आत्माराम कोळी (45, रा.माचला, ता.चोपडा), पवन नवल माळी (22, रा.पाटीलगढी, चोपडा, ता.चोपडा), रवींद्र आनंदा माळी (20, रा.माचला, ता. चोपडा) अशा 11 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे.