चोपडा कसबे सोसायटीवर ‘सहकार’चे वर्चस्व

0

चोपडा । येथील चोपडा कसबे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी चेअरमन विठ्ठलदास गुजराथी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल सर्व 13 जागांवर दणदणीत मतांनी विजयी झाले आहे. तर दिलीपराव पाटील व प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणूकीत सहकार पॅनलचे सर्वसाधारण कर्जदार मतदार संघात विद्यमान चेअरमन प्रवीण विठ्ठलदास गुजराथी (676), डॉ.सुभाष देसाई (648), गोपाल भनकु चौधरी(610), प्रवीण मुरलीधर देशमुख (606), श्रीकांत शांताराम नेवे (606), दत्तु धाकु मराठे(595), गजानन गंगाराम पाटील(563), मुश्ताक अहमद मो.शफी जहागिरदार (551, शोभाबाई वसंतराव बडगुजर (678), आशालता सुरेश देशमुख (619), ओबीसी संघातून युवराज दगडू महाजन(721), नारायण सुका बाविस्कर (688), महेंद्र वासुदेव शिरसाठ (542) हे विजयी झाले आहेत.

1839 पैकी 1006 मतदारांचे मतदान
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी व्ही.व्ही.गरुड व त्यांच्या सहकार्‍यांनी काम पाहिले. मतदान संस्थेच्या ‘सावली’ इमारतीत सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला दुपारी 4 वाजेपर्यंत 1839 मतदारांपैकी 1006 मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदान प्रक्रीयेनंतर झालेल्या मतमोजणीत ‘सहकारने’ एकतर्फी बाजी मारली. तसेच ढोल ताश्यांच्या निनादात, फटाक्यांच्या कडकडाटात मिरवणुकीने माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी आलेल्या उमेदवारांचे विठ्ठलभाई गुजराथी, वसंतलाल गुजराथी, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, पीपल्स बॅक चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी सत्कार केले. धनगर अळी, सुंदरगढी या भागात रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरूच होती. 45 वर्षांची परंपरा कायम माजी चेअरमन विठ्ठलदास गुजराथी यांच्या एकखांबी नेतृत्वाखाली सोसायटीने मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली आहे.