चोपडा कृउबाच्या मासिक सभेवर आठ संचालकांचा बहिष्कार

0

चोपडा। येथील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येत असते. परंतु ही सभा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेवुन सत्ताधार्‍यांना काय साध्य करावयाचे होते. हे न उलगडणारे कोडच आहे. म्हणून ह्या मासिक सभेवर 20 संचालकांपैकी काही सदस्यांनी सभेनंतरच्या जेवणावळीच्या कारणावरून सभेवर बहिष्कार टाकण्यात आला. शनिवार 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात संचालक मंडळाची मासिक सभा विविध विषयांवर बोलावण्यात आलेली होती.

20 पैकी 12 संचालक उपस्थित
या सभेसाठी प्रत्येक संचालकांना रीतसर अजेंडा पाठविण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे सभा संपल्यावर जेवणाचे आमंत्रण प्रत्येकांना फोनवरून देण्यात आले होते. सदर सभा नियोजित वेळेवर सुरू झाली मात्र 20 पैकी 12 संचालक उपस्थित होते. त्यामुळे जे 8 संचालक सभेला आले नाहीत, त्यांना पुन्हा फोन करण्यात आले. मात्र प्रत्येकाने वेगवेगळी कारणे सांगत सभेला येण्याचे टाळले. सदर संचालक मंडळाच्या सभेनंतर जेवण ठेवण्यात आले होते ते जेवण ठेकेदाराकडून ठेवण्यात आल्याने काही सदस्यांनी या सभेवर बहिष्कार टाकल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. आजच्या सभेस अनुपस्थितीबद्दल वरील कारणाबाबत संचालकांना विचारले असता तिघांनी दुजोरा दिला.

ज्या ठेकेदारचे काम बोगस आहे. त्याचे केलेले काम तपासण्या ऐवजी आशा ठेकेदाराकडून जेवण ठेवले म्हणून आम्ही सदर सभेवर बहिष्कार टाकला.
 धनंजय पाटील, संचालक कृउबा

मी प्रत्येक सदस्याला फोन केला त्यांनी कोणीही बहिष्काराचा विषय केला नाही. आपापली वैयक्तिक कारणे त्यांनी सभेला न येण्याचे सांगितले.

जगन्नाथ पाटील, सभापती ,कृउबा