चोपडा ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी नंदकिशोर सोनवणे

0

चोपडा। चोपडा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भारडू ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा हातेड (ता.चोपडा ) येथील रहिवाशी नंदकिशोर सोनवणे यांची चोपडा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पूर्वीचे तालुकाध्यक्ष सी.एन. सोनवणे यांची राज्य कौन्सिलवर निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

यावेळी त्यांचे प्रभारी गटविकास अधिकारी सी.टी.गोस्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे सचिव पी.आर. पाटील, कैलास पाटील, जे.आर.विसावे, एम.एल.चौधरी, बापू कोळी, सुलताने आदी उपस्थित होते. नंदकिशोर सोनवणे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.