चोपडा तालुक्यात अफूच्या शेतीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाडसी कारवाई

चोपडा : शेतीतून उत्पन्न निघत नसल्याने तरुण कर्जबाजारी झाला व त्यानंतर त्याने यु ट्यूबवरून अफुची शेती करण्याबाबत माहिती जाणून घेतली मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्यासह पथकाने कारवाई करीत तरुणाला बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे. चोपडा तालुक्यातील वाळकी येथे ही कारवाई करण्यात आली.

नापिकीमुळे तरुण झाला कर्जबाजारी
तालुक्यातील वाळकी येथे संशयित आरोपी प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे 5 बिघे शेती आहे. परंतु सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर त्याने वेगळ्या मार्गाने पैसा कमविण्याचे ठरविले. प्रकाशने युट्युबवरून अफूची शेती कशी करता येईल?, याचे धडे घेतले. यानंतर त्याने जवळपास चार बिघे या क्षेत्रात अफूची शेती केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून आजूबाजूला मका पेरला. दरम्यान स्थानिक पातळीवरून गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरविले. शुक्रवारी सकाळी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्यासोबत मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी धडक दिली. संबंधित तरुणाची विचारपूस केली असता त्याने आपल्यावर प्रचंड कर्ज होते आणि त्यामुळे खूप त्रास होत होता. म्हणून आपण अफूच्या शेतीचा मार्ग अवलंबिले त्याने प्राथमिक चौकशीत सांगितल्याचे कळते.

युट्युब बघून घेतले अफूच्या शेतीचे धडे
कर्जबाजारीपणामुळे आपल्याला वेगळ्या मार्गाने पैसा कमवा लागेल, हे प्रकारच्या लक्षात आल्यानंतर त्याने युट्युब बघून अफूची शेती कशी करता येईल? पीक आल्यानंतर कशा पद्धतीने खसखसच्या स्वरुपात तिची विक्री करता येईल,याचे पूर्ण धडे युट्युब वरून घेतले. पोलिसांनी प्रकाशच्या मोबाईल जप्त केल्यानंतर त्यात अफूच्या शेतीची संबंधित काही व्हिडिओ आढळून आले आहेत.

अवघ्या पंधरा दिवसानंतर अफूचे पीक निघणार होते
प्रकाशने साधारण डिसेंबर महिन्यात चार बिघे अफू पेरला होता. त्यामुळे अफूचे पीक आता पूर्णपणे तयार झाले होते आणि पुढील पंधरा दिवसात त्या पिकाची कापणी करण्याचे प्रकाशचे नियोजन होते परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली.