Uncle and niece killed on the spot in horrific accident while taking sister home : Incident In Chopda Taluka चोपडा : दिवाळी सणानिमित्त बहिणीला माहेरी नेत असलेल्या भावाच्या दुचाकीला समोर आलेल्या भरधाव ट्रकने उडवल्याने मामा-भाचीचा जागीच मृत्यू झाला तर विवाहिता गंभीर जखमी झाल. हा भीषण अपघात चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी घडला. विधी कोळी (6, दहिदुले, ता.धरणगाव) व आबा कोळी (विरवाडे, ता.चोपडा) अशी मयतांची नावे आहेत.
दुचाकी अपघातात दोघे ठार
शुक्रवार, 28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एम.एच. 19 सी.एच.5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एच.आर. 56 बी. 4688) ने जोरदार धडक दिल्याने मामा-भाची जागीच ठार झाले तर विवाहिता गंभीर जखमी झाले.
माहेरी जाताना ओढवले संकट
धरणगाव तालुक्यातील दहिदुले येथील सासर व विरवाडे, ता.चोपडा येथील माहेर असलेली विवाहिता दिवाळी सणानिमित्त मुलगी विधीसह भाऊ आबासोबत दुचाकीने माहेरी जाण्यासाठी निघाली होती मात्र क्रुर काळाने झडप घातल्याने मामा-भाची अपघातात ठार झाले तर विवाहिता गंभीर जखमी झाली तर विवाहितेचा दिड वर्षीय चिमुकला सुखरूप बचावला आहे. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावीत झाली.