चोपडा । चोपडा गेल्या तिन महिन्यापुर्वी नगर पालीका निवडणूक झाली या निवडणूकी अगोदर शिवसेनेचे माजी आमदार कैलास बापु पाटील व विद्यमान आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्यात अंतर्गत विषयावरुन मतभेद दुरावल्याने आज दोघे आजी माजी आमदार एकमेकांपासुन कायमचे संबंध तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे न.पा. निवडणूक मंध्ये माजी आमदार कैलास पाटील यांनी प्रचारात सहभाग न घेता चार हात लांबच राहणे पसंत केले होते. मात्र नुकत्याच झालेल्या जि.प. व पं.स. निवडणूकीत तरी एकत्र येण्याची संभावणा व्यक्त केली जात होती. मात्र शेवटी माजी आमदार कैलास बापु पाटील यांनी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत कोणत्याही निवडणूकीत राहणार नसल्याचे स्पष्ट दिसुन आले आहे. यामुळे दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ ह्या म्हणीप्रमाणे भाजपला आज तरी मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. म्हणून तालुक्यात तरी भाजपा आज मोठा पक्ष म्हणून दिसुन आला आहे कारण बापुचा गटाने शिवसेना विरुध्द काम केल्यामुळे भाजपला साथ दिल्याचे लागलेला निकालानंतर तालुक्यात चर्चा सुरू आहे पं.स.वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु या निवडणूकीत माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना काही गटात व गणात सक्षम उमेदवार न मिळाल्यामुळे पाच जागावर समाधान मानावे लागत असले तरी आता पं.स.वर सत्ता मिळविण्यासाठी कोणाला सोबत घेणार का विरोधात बसणार. याकडे आता तालुक्याचे लक्ष लागुन आहे तर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष संदिप पाटील यांना स्वतः हाचा तालुक्यात तर पं.स.मंध्ये खाते देखिल उघडता आले नाही हो शोकांतिका आहे.
गणातून निवडून आलेले उमेदवार मतदार निहाय
चौगाव गणातून प्रतिभा बापुराव पाटील (4873) भाजपा हे विजयी झाले, तर निलाबाई यशवंत कोळी (106)कपाट, मिराबाई मधुकर पाटील (276) रोडरोलर, संगिताबाई सुनिल महाजन (2036) राष्ट्रवादी, सुलभा विनोद राजपूत (2795) शिवसेना यांचा पराभव झाला. विरवाडे गणातून आत्माराम गोरख माळके (3461)भाजपा हे विजयी झाले, तर रमेश बधू पाटील (1844) राष्ट्रवादी, प्रताप खाज्या पावरा (1956) शिवसेना, बुलाब रातू बारेला (725) अपक्ष, जामसिंग कोल्या बारेला (310) अपक्ष यांचा पराभव झाला. धानोरा प्र.अ.गणातून कल्पना दिनेश पाटील (4993) राष्ट्रवादी हे विजयी झाले, तर बेबाबाई जहांगीर तडवी (2100) भाजपा, माया सावन महाजन (2744) शिवसेना यांचा पराभव झाला. अडावद गणातून अमिनाबी रजाक तडवी (3949) राष्ट्रवादी हे विजयी झाले, तर उषाबाई बापू कोळी (366) शिटी, मंगला आसाराम कोळी (1569) शिवसेना, माया प्रविण ठाकूर (504) अपक्ष, कुश्माबाई खुमान बारेला (3334) भाजपा यांचा पराभव झाला. चुंचाळे गणातून भूषण मधुकर भील (3463) भाजपा हे विजयी झाले, तर देविदास खंडू कोळी (2428) शिवसेना, साहेबु इब्राहीम तडवी (3145) राष्ट्रवादी) यांचा पराभव झाला. अकुलखेडा गणातून रामसिंग अमरसिंग पवार (4766) भाजपा हे विजयी झाले, तर राधा दिलीप अहिरे (798) शिवसेना, रोहिदास भाईदास भिल (3392) काँग्रेस यांचा पराभव झाला. लासूर गणातून पल्लवी वना भिल (3587) भाजपा हे विजयी झाले, तर सुरेखा सुभाष कोळी (2146) शिवसेना, निर्जलाबाई रोहिदास भिल (2143) काँग्रेस यांचा पराभव झाला. घोडगाव गणातून मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील (4463) शिवसेना हे विजयी झाले तर, कांतिलाल अभिमन पाटील (69) बॅट, विनायक वसंत पाटील (2108) भाजपा, ललित सुभाष बागुल (3046) राष्ट्रवादी यांचा पराभव झाला. चहार्डी गणातून मालूबाई गोविंदा कोळी (3651) राष्ट्रवादी हे विजयी झाले, तर संगिताबाई तुळशीराम कोळी (3613) शिवसेना, सुनिता दुर्योधन ठाकरे (1443) भाजपा, रुखमाबाई अशोक वाघ (176)अपक्ष यांचा पराभव झाला. बुधगाव गणातून कल्पनाबाई यशवंत पाटील (3908) राष्ट्रवादी हे विजयी झाले, तर शैलाबाई पारस पाटील (2853) शिवसेना, अल्पना तुषार साळुंखे (1710) भाजपा यांचा पराभव झाला. गोरगावले बु॥ गणातून भरत विठ्ठल बाविस्कर (3172) शिवसेना हे विजयी झाले, तर नामदेव प्रल्हाद कोळी (336), योगेश आत्माराम कोळी (436), रोहिदास डूमन कोळी (3106), अतुल भिमराव ठाकरे (2871) राष्ट्रवादी यांचा पराभव झाला. वर्डी गणातून सुर्यकांत गोविंदा खैरनार (3833) राष्ट्रवादी हे विजयी झाले, तर रविंद्र एकनाथ नन्नवरे (3457) शिवसेना, देवानंद धनसिंग शिंदे (3441) शिटी, सत्यजित मच्छिंद्र सपकाळे (652) अपक्ष, मच्छिंद्र उत्तम साळुंखे (92) बॅट यांचा पराभव झाला.