चोपडा धरणगाव रस्त्यावर ट्रक – बसचा अपघात

0

चोपडा । शहरापासून काही अंतरावर असलेल्या चोपडा धरणगाव रस्त्यावर दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास रेलचा मारूती मंदिरा जवळील वळणावर ट्रक आणि बसचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी 27 रोजी घडली. या अपघातात सात जण जखमी झाले आहे. पाऊस सुरु असतांना रेलचा मारूती जवळ चोपड्याकडे येणारी धुळे बस क्रमांक एम.एच.20 डी 9029 तसेच चोपड्याकडून जाणारी ट्रक क्रमांक एम.एच.43 डी.419 यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातात धुळे येथील बस चालक राजेश दिलीप कोकरे (40), विरवाडे येथील दशरथ फकिरा कोळी (68), यावल तालुक्यातील शिरसाड प्रल्हाद दौलत पाटील (65), विरवाडे दिपक माणकू सोनवणे (36) , यावल तालुक्यातील वढोदा येथील अशोक आनंदा जोगी (30),

अमळनेर तालुक्याती कचरे येथील निलेश संभाजी पाटील, धुळे येथील वाहक हंसराज हिंमत पवार (45) ,चोपडा येथील ट्रक चालक शे.जाकिर शे.फत्तु (45) आदी यात जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.पंकज पाटील, डॉ.पी.पी.पाटील यांनी उपचार केले. पुढील उपचारासाठी जळगाव व धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान चोपडा आगाराचे आगार प्रमुख किशोर अहिरराव, चंद्रभान रायसिंग, भगवान न्हायदे, अतुल सोनवणे यांनी जखमींची विचारपूस करीत त्यांना तात्काळ मदत केली. या अपघाताबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.