चोपड । नगरपालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगारोथ्थान महाअभियान योजने अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली आहे. योजनेस मध्यवर्ती नियोजन संकल्प चित्र व संनियंत्रण कक्ष ठाणे यांच्याकडून 67 कोटी 20 लाख 32 हजार 169 इतक्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. अशी माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेकडून पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी मागणी सुरु होती. योजनेच्या तांत्रीक मान्यतेनंतर राज्यस्तरीय निवड समिति कडून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. जवळ पास एका वर्षात ही योजना मार्गी लागण्याची शक्यता नगराध्यक्षा चौधरी यांनी दिली आहे.
42 टक्के जलसाठा
जुन्या पाणी पुरवठा योजने नुसार आजची शहराची लोकसंख्या तिप्पटीने वाढ झाल्याने पाणी पुरवठ्यावर ताण पडत होते. मागील वर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना शहराला करावा लागला होता. या वर्षी तशी टंचाई जाणवू नये होऊ यासाठी नगरपलिकेर्फे योग्य नियोजन करण्यात आले आहे. गुळ मध्यम प्रकल्प व तापी नदी कठोरा पम्पिंग वरून शहरास पाणी पुरवठा करण्यात येतो. गुळ मध्यम प्रकल्पाच्या 15 टक्के पाणी शहरासाठी आरक्षित आहे त्यानुसार 250 द.ल.घ.फूट एव्हढेच आरक्षित आहे. 42टक्के पाणी साठा धरणात शिल्लक आहे हा साठा जून महिन्याच्या अखेर पर्यंत शहरास पुरण्यासाठी नगर पालिकेने योग्य नियोजन केले आहे.
पाणी बचतीसाठी प्रयत्न: मागील काही वर्षापासून शहराला तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी बचतीसाठी नगरपालिकेतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे. भविष्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी अंगणात पाणी शिंपडू नये, नळस तोटी टावाव्यात, अवैध नळ कनेक्शन शोध मोहिम नगर पालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख,माजी उपनगराध्यक्ष जीवन चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, गजेंद्र जैसवाल, हुसेन पठान आदी उपस्थित होते.