चोपडा पीपल्स बँक व अरुणभाई गुजराथींच्या अमृत महोत्सव कार्यक्रम

0

चोपडा । येथील अग्रगणी संस्था चोपडा पीपल्स को.अ‍ॅाप.बँकेच्या 75 व्या अमृत महोत्सवासह राष्ट्रवादी काँग्रसचे जेष्ठ नेते व माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवाचा दुग्धशर्करा योग यावर्षी जुळून आल्याने सोमवारी 29 मे रोजी भव्य सोहळा शहरातील प्रताप विद्या मंदिरात आयोजित करण्यात येणार असल्याने सध्या जोरदार हलचाली सुरु आहेत. या कार्यक्रमासाठी बॅकेंने समित्यांची नियुक्ती केली आहे.

समित्या खालील प्रमाणे : जाहिरात, प्रसारण व स्मरणिका संकलन समिती – गोविंद गुजराथी, डी.आर.जगताप, अवधुत ढबू, वसंत नागपुरे, कमलेश गायकवाड, राजेश सराफ, श्रीकांत नेवे, मेहुल पाटील, संजय बारी. भोजन समिती- अनिल गुजराथी, हेमंतकुमार अग्रवाल, प्रफुल्ल गुजराथी, प्रशांत भावसार, श्रीकांत देसाई, निलेश देसाई, धिरेंद्र जैन, गिरिष माळी, धरमचंद जैन, चंदुलाल पालिवाल, देविदास गुजराथी, विजय पाटील, राजेंद्र जैन, अ‍ॅड.सुधीर जैन, ओटा परिवार, पवन अग्रवाल, पियुष अग्रवाल, संजय सोमाणी. कार्यक्रम व्यवस्थापन समिती- प्रकाश वडे, प्रा.शाम गुजराथी, आशिष गुजराथी, रमणलाल गुजराथी, अशोक गुजराथी, रसिकलाल जैन, अ‍ॅड.अशोक जैन, अ‍ॅड.जी.के.पाटील, घनःश्याम अग्रवाल सजावट समिती – अरविंद गुजराथी, संजय जैन, नितीन गुजराथी, राहुल जैन, प्रमोद जैन, सुभाष देसाई, शिरीष गुजराथी, सुनिल देशमुख, शरद गुजराथी, किरण गुजराथी. सांस्कृतिक समिती – भोजराज पोतदार, लक्ष्मण पाटील, शिरीष गुजराथी, रमेश हुंडीवाले, अशोक सोनवणे, मणीलाल पोतदार, माणकलाल जैन. स्वागत समिती – कल्पना गुजराथी, पुनम गुजराथी, आश्विनी गुजराथी, मृणाल गुजराथी, राजश्री गुजराथी, प्रीती गुजराथी, मिना देसाई, रेणू अग्रवाल, हर्षाचा गुजराथी, पुनम गुजराथी, वैशाली गुजराथी, संतोष अग्रवाल, माधुरी मयूर, सिमा जैन, तृप्ती सोमाणी, अरूणा पाटील, मनीषा चौधरी, पल्लवी मयूर याप्रमाणे यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री व मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॅाग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, राज्याचे मंत्री ना.गिरिष महाजन, ना.सुभाष देसाई, पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासह विविध पक्षांचे खासदार, आमदार, माजी आमदार ,नेते उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने पीपल्स बँकेने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध समित्यांची रचना करण्यात आली आहे.