स्थानिक गुन्ह शाखेकडून गुन्ह्याचा छडा
जळगाव : चोपडा आगारात राकेश मुरलीधर पाटील (रा.कृषीनगर, ढेकू रोड, अमळनेर) या वाहकाच्या खिशातील ऐवज लांबविल्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचा छडा लावला आहे. या गुन्ह्यात पथकाने अशोक श्यामराव भिल (35 ,रा . विरवाडे, ता.चोपडा) या एस.टी.बस चालकास अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा आगारात सुमारे 6 वर्षापसून बस वाहक म्हणून राकेश पाटील हे कार्यरत आहेत. 16 ऑक्टोबर रोजी राकेश पाटील हे इंदूर (मध्यप्रदेश ) येथून ड्युटी करुन सकाळी 4 वाजता चोपडा बस स्थानक येथे उतरले. तेथीलच आराम कक्षात आराम केला. यावेळी कक्षात 10 ते 15 एस.टी .चालक व वाहक सुद्धा आराम कक्षात आराम करीत होते. राकेश पाटील सकाळी 10 वाजेच्या सुमारास झोपेतून उठले असता त्यांच्या पॅन्ट व शर्टाच्या खिशातील ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी तक्रारीवरुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
चोपडा आगारातील चोरीच्या घटनांचा पर्दाफाश
चोपडा बस स्थानकात येथे वारंवार चोर्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सवतंत्र पथक नियुक्त केले होते. पथकातील हवालदार विजय पाटील, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारुळे , मनोज दुसाने ,किरण धनगर व प्रविण हिवराळे यांनी आठ दिवसात केलेल्या 20 ते 25 जणांच्या चौकशीअंती ठोस पुरावे मिळविले. व आगारातील चालक अशोक भील यास पथकाने बुधवारी अटक केली. चोपडा पोलिसांच्या ताब्यात दिले.