चोपडा महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

0

चोपडा । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी 330 व्या रँकने उत्तीर्ण झाल्या बद्दल महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आशिष ईश्‍वर पाटील व एमएचटी-सीइटी 2017 च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासो. डॉ. सुरेश जी.पाटील यांच्या अध्यक्षेते खाली करण्यात आले. आशिष ईश्‍वर पाटील यांचा शाल, बुके व सन्मान पत्र देवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासो. डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

सीईटी 2017 मधील यशाचे मानकरी
प्रथम शौनक चौधरी, द्वितीय आरती अनंत चौधरी, तृतीय देवल पाटील, मानसी पाटील, आशिष सचदेव, अश्‍वघोप शिरसाळे, तेजस चौधरी, विनित पाटील, आदिती अशोक बोरसे, प्रसन्न जडे, अनिकेत कडनोर, विपुल पाटील सीईटी परीक्षेत यश संपादन केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. डी.ए.सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक उपप्राचार्य व्ही.जी.पाटील यांनी केले. बी.एस.हळपे यांनी केले. शौनक चौधरी, आरती चौधरी, मानसी पाटील व पालक संभाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.ए.एल.चौधरी, डॉ.के.एन. सोनवणे, ईश्‍वर पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.